Saturday, August 21, 2010

निलू फुले

निलू फुले
एक गाव बारा भानगडी या चित्रपटात अतिशय बारीक़ शरीराचा झेले अन्ना साकारून   निलुभाऊ 
यांनी मराठीला एक नविन प्रकारचा कारस्थानी, आतल्या गाठिचा खलनायक दिला अणि मराठीला एक सशक्त अभिनेता मिळाला. पुढे ग्रामीण पुढारी म्हणजे निलुभाऊ हे समीकरण बनले . सामना ,लक्ष्मी अशा चित्रपट मधून भूमिका करताना चोरीचा मामला , हरया नार्या जिंदाबाद यात विनोदी भूमिका केल्या . सिंहासन या चित्रपटात दिनु या पत्रकाराची भूमिका करताना अभिनयाचे गहिरे रंग भरले . रंगभूमीवर त्यांनी केलेला सखाराम  बैंडर अजरामर झाला . सूर्यास्त , कथा अकलेच्या कांद्याची ही  त्यांनी भूमिका केलेली नाटके खुपच गाजली . निलुभाऊ हिंदीत देखिल काम करीत .सारांश ,कुली या चित्रपटात त्यांनी केलेल्या भूमिका रसिकांच्या आजही स्मरणात  आहेत .