अशोक सराफ

मराठी चित्रपट अशोक सराफ यांच्या शिवाय पूर्ण होउच शकत नाही . ह्या अभिनेत्याने भूमिकेचा एकही प्रकार करण्याचे ठेवले नाही . विनोदी ,गंभीर ,चरित्र अभिनेता , अभिनेता , गुंड ,खलनायक ,निर्माता असे सर्व प्रकार हातालुन त्यात अपन कुठेही कमी नाही हे त्यांनी आपल्या समर्थ अभिनयाने दाखवून दिले .अशोक सराफ यांची अभिनयाची सुरुवात रंगमंचा पासून झाली. सर्व निर्माता दिग्दर्शक यांचेकडे त्यांनी काम केले . सचिन , महेश कोठारे ,अनंत माने , विश्वास सरपोतदार अशा अनेक निर्मात्यांकडे त्यांनी काम केले . हिंदीत देखिल त्यांनी अनेक चित्रपट केले. दादा कोंडके ,लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर त्यांची जोड़ी खुप यशस्वी ठरली .