सूर्यकांत

सूर्यकांत

                मराठी चित्रपटात पाटील रंगवावा तर सूर्यकांत यांनीच. सूर्यकांत यांचे बंधू चंद्रकांत हे ही चित्रपटात काम करीत . सूर्यकांत आणि जयश्री गडकर यांची जोड़ी विशेष करून गाजली. या जोडीचा साधी मानस हा चित्रपट विशेष गाजला. सूर्यकांत यानी इर्षा या चित्रपटाची निर्मिती केली. त्यांचे धाकटी पाती नावाचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे .ऐतिहासिक चित्रपटात शिवाजी ,संभाजी ह्या भूमिका ते समरसून करीत . बाबा कदम यांच्या पद्मजा अर्थात ज्योतिबाचा नवस या कादंबरीवर आधारित ज्योतिबाचा नवस ह्या चित्रपटातील त्यांची दरोड़ेखोराची भूमिकाही गाजली .