Tuesday, October 26, 2010

दामू आन्ना मालवंकर

दामू आन्ना मालवंकर 
जून्या काळात मराठी चित्रपटावर साम्राज्य करणारे विनोदी चरित्र अभिनेते . एक डोळा किंचित तिरका असल्याने त्या विनोदाला एक अंगभूत साथ मिलाली होती असेच म्हणता येइल . दिलीप प्रभावलकर यांचे आधी चिमणराव ही भूमिका करणारे कलावंत . बोलण्यात ठसका , संवादाची वेगळी फेक , डोळ्यांचा भन्नाट वापर  यातून ते प्रेक्षागार हशानि फुलवून टाकित . विनोदी भूमिका करताना गंभीर भूमिका देखिल त्यानी केल्या . कृष्ण धवल चित्रपटाचे एक वेगले व्यक्तिमत्व म्हणून दामू आन्ना हे प्रसिद्द आहेत . अनुनासिक स्वरात बोलने , बोलण्यात वेगळी छटा असे .

Monday, October 25, 2010

दया डोंगरे

दया डोंगरे
मराठी चित्रपट तसेच रंगभूमि या दोंहिमध्ये कार्यरत अभिनेत्री . मॉडर्न दिसणारी , विशेषता खलनायकी भूमिका करणारी एक दर्जेदार , अभिनय संपन्न अभिनेत्री म्हणून त्या प्रसिद्द आहेत . अभिनयात विलक्षण तरबेजपना दिसतो . करारी मुद्रा , देहबोली यातून त्या आपला अभिनय साकार करतात .    रंगभुमिवारिल अनेक नाटकात त्यानी भूमिका केल्या आहेत . सचिन दिग्दर्शित " नवरी मिले नवर्याला " ह्या मधील त्यांची भूमिका छान होती . दूरदर्शनची सुरवात झाली त्या काळात अनेक कार्यक्रम त्यानी केले आहेत . विशेषता चरित्र अभिनेत्री म्हणून त्या प्रसिद्द आहेत .अनेक मराठी नाटके , चित्रपट यात समर्थपणे काम करून त्यांनी स्वताची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.  

Saturday, October 23, 2010

फैयाज खान

  फैयाज खान 
फैयाज नावाने प्रसिद्द . रंगभूमि तसेच मराठी चित्रपट यात सारखेच योगदान . विशेषता मराठी संगीत नाटके केली आहेत .वसंतराव देशपांडे यांचे बरोबर  कट्यार ........मधे तिने साकारलेली हमीदा ही व्यक्तिरेखा खुप गाजली.  अश्रुंची झाली फुले हे , गुंतता ह्रदय हे अशी अनेक गाजलेली नाटके त्यानी केली आहेत . जयवंत दलवी यांच्या महानंदा कादंबरी वर आधारित त्याच नावाच्या चित्रपटात त्या नायिका होत्या . यातील " मागे उभा मंगेश , पुढे उभा मंगेश " हे गीत खुप गाजले . संयत अभिनय , मोजक्या भूमिका ही त्यांची कारकिर्दीची वैशिष्ट्ये आहेत .

Wednesday, October 6, 2010

दुर्गा खोटे

दुर्गा खोटे
कृष्ण धवल  चित्रपट युगापासुन  कार्यरत असलेल्या , मराठी आणि हिंदी चित्रपटात सारख्याच  ताकतीने काम करणार्या एक जेष्ठ अभिनेत्री .  सिनेमात काम करणे चांगले नाही अशा जमान्यात सुशिक्षित अशा दुर्गा बाई यानी चित्रपटाला एक घरंदाज अभिनेत्री दिली . सुरुवातीला   नायिका,त्यानंतर आई अणि त्यानंतर आजी ,सासु अशा भूमिका त्यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटात केल्या . आपल्या अतिशय लोभस , श्रेष्ठ अभिनयाने त्या नेहमीच गाजल्या .  

Sunday, October 3, 2010

कुलदीप पवार

कुलदीप पवार
मराठी चित्रपट स्रुष्टिला लाभलेला मर्द नायक . जावयाची जात ह्या मधून काम करताना त्यांनी आपला रांगडा नायक खुपच छान सादर केला . त्यानंतर नायका बरोबरच खलनायक देखिल त्यानी केले . तसेच काही विनोदी भूमिका देखिल केल्या .  मराठी चित्रपट करतानाच त्यांनी रंगभूमीवर देखिल पाऊल ठेवले . "राजकारण गेल चुलीत" तसेच इतर नाटके त्याची साक्ष आहेत .  आजही ते चित्रपट , रंगभूमि ह्या दोन्ही माध्यमात सारख्याच ताकतीने कार्यरत आहेत .  

Thursday, September 30, 2010

विक्रम गोखले

विक्रम गोखले
एक  सशक्त, गंभीर भूमिका करणारा दर्जेदार कलावंत. मराठी चित्रपट अणि रंगभूमि अशा दोन्ही मध्ये सारख्याच ताकतीने वावर . हिंदीत देखिल स्वताची छाप पाडली. आवाजावर विलक्षण पकड़, मुद्रा , डोळे तसेच अकुनच देह्बोलिचा वापर अभिनयात करतात .  नायक तसेच चरित्र अभिनेता म्हणून अनेक भूमिका केल्या आहेत . स्पष्टवक्ता ,स्वतन्त्र विचार ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत . माहेरची साड़ी ह्या चित्रपटात त्यांची भूमिका गाजली .हिंदीत हम दिल दे चुके सनम मधील करारी बाप त्यानी उत्तम सादर केला आहे . रंगभूमीवर त्यानी अनेक नाटके केली आहेत . प्रसिद्ध सिने अभिनेते स्व. श्री चंद्रकांत गोखले हे त्यांचे वडिल .     

Wednesday, September 22, 2010

मधु कांबिकर

मधु  कांबिकर 
छोट्या छोट्या भूमिका करीत नायिकेच्या भुमिकेपर्यंत पोचलेली एक गुणी अभिनेत्री . नृत्य हा त्यांचा मुख्य गुण . पूर्वी त्या मुख्य नायिकेच्या मागे नाचनार्या छोट्या भूमिका करीत . तमाशाच्या फडात काम करणारी नृत्यांगना ही त्यांची मुख्य ओळख .    अशा अभिनेत्रिने " शापित " या चित्रपटात केलेली भूमिका अत्यंत गाजली . ह्या चित्रपटाने त्यांच्या अभिनयाची दिशाच बदलली . ह्या चित्रपटात त्यानी आपल्या अभिनयाने गहिरे रंग भरले .हा चित्रपट त्यांच्या आयुष्यात बदल करणारा होता . त्यानंतर त्यांची स्वताची खर्या अर्थाने स्वतन्त्र ओळख निर्माण झाली . आता त्या चरित्र अभिनेत्रीच्या भूमिका करतात .

Sunday, September 12, 2010

रत्नमाला

रत्नमाला
दादा कोंडके यांची आये . तोंडात शिवी पण मनाने चांगली अशी आये त्यांनी  दादांच्या अनेक चित्रपटात झोकात रंगविली . त्यांचे सहज सोपे पण रांगडे संवाद रसिकांची दाद घेवुन गेले . त्यापूर्वी चरित्र अभिनेत्री म्हणून त्या गाजल्या . मुद्रा ,डोळे यांचा सहज वापर , बोलका चेहरा याद्वारे त्या सहज सुन्दर अभिनय करीत . चरित्र अभिनेत्री करताना विशेषता त्या सोशिक आई , सासु या भूमिका उत्तम करीत . दादा कोंडके यांच्या बरोबर मात्र त्यांची आई ही भूमिका  कजाग, भांडखोर अशीच असे . रसिकाना त्यांच्या इतर भूमिका माहित असल्या तरी दादा कोंडके यांची आये मात्र कायम लक्षात राहिली आहे .       

आचार्य अत्रे

आचार्य अत्रे
मराठी मानुस ज्या दैवताना मानतो त्यात अत्रे यांचे नाव निश्चित घ्यावे लागेल . श्यामची आई  सारखा चित्रपट काढून त्यांनी मराठीला एक देणगीच दिली आहे . या चित्रपटाला राष्ट्रपति पारितोषिक मिळाले . त्यांचा दूसरा चित्रपट महात्मा ज्योतिबा फुले . हा चित्रपट देखिल राष्ट्रपति पारितोषिक विजेता ठरला . अनेक विनोदी नाटके त्यानी लिहिली . लग्नाची बेडी , साष्टांग नमस्कार ही त्यांची नाटके रंगभूमि गाजवित आहेत . धो धो करून हसवणारा विनोद  एकीकडे   तर संस्कृति दाखविनारे चित्रपट दुसरीकडे अशा दोन्ही प्रकारची टोके समर्थ पणे त्यानी साकार  केली .

गो . नि . दांडेकर

गो . नि . दांडेकर
मराठी  कथा, कादंबर्या त्याच प्रमाणे मराठी नाटक, चित्रपट यात  वेगळ्या कथा लिहिल्या आहेत . त्यांच्या पवना काठाचा धोंडी , जैत रे जैत ह्या कादंबर्या वर चित्रपट निघाले . ह्या मधून त्यांनी ग्रामीण तसेच आदिवासी भाग वेगळ्या  स्वरूपात पडद्यावर साकार केला .  जैत रे जैत मधील गाणी खुपच गाजली . निसर्गात रमणारा, निसर्गाची अवड असणारा नायक , स्फूर्ति देणार्या कथा ही त्यांच्या कथेची वैशिष्ट्ये होत .    

Tuesday, September 7, 2010

दत्ता भट

दत्ता  भट 
अनेक  मराठी  नाटके , चित्रपट याद्वारे मराठी रंगभूमि तसेच चित्रपट   स्रुष्टिला आपल्या प्रगल्भ अभिनयाने  परिचय करून देणारा चरित्र अभिनेता .नटसम्राट या नाटकातील अप्पासाहेब बेलवलकर ही भूमिका  ताकतीने उभी  करणार्या कमी अभिनेत्यांमध्ये   त्यांची गणना होते . सिहासन या चित्रपटात ग्रामीण आमदार त्यांनी ज्या प्रकारे उभा केला आहे त्याला खरोखर तोड़ नाही . खर्जातिल बोलने , उत्कृष्ट मुद्राभिनय ही त्यांची अभिनयाची वैशिष्ट्ये .  

निवेदिता जोशी सराफ

निवेदिता जोशी सराफ
अशोक सराफ यांच्या पत्नी व प्रसिद्द अभिनेत्री . महेश कोठारे , सचिन  यांच्या अनेक चित्रपटात नायिका , सहनायिका म्हणून काम केले . हिंदीतील अपनापन मधून  चित्रपटात पदार्पण . मराठी नाटके देखिल गाजली . अशी ही बनवा बनवी , धूमधडाका , आमच्या सारखे आम्ही  इ . चित्रपट गाजले . रंगभूमीवर देखिल वेगला ठसा निर्माण केला . मराठी चित्रपट निर्मिती क्षेत्रात उतरून यशस्वी निर्मात्या ठरल्या आहेत . जाहिरात , नाटक , चित्रपट , अशा विविध क्षेत्रात अजूनही जोमाने कार्यरत आहेत . 

Wednesday, September 1, 2010

रविन्द्र महाजनी

रविन्द्र महाजनी  
मराठी चित्रपट स्रुष्टिला लाभलेला देखणा , रुबाबदार अभिनेता . मराठीला त्यांचे रुपाने एक हिंदीच्या तोडीचा अभिनेता लाभला .  रविन्द्र महाजनी यांची रंजना , उषा नाइक ,आशा काले    यांच्या बरोबर    अनेक चित्रपटात जोड़ी जमली . मुम्बैचा फौजदार , हलदी कुंकू , दुनिया करी सलाम , गोंधलात गोंधळ   या  चित्रपटात त्यांच्या भूमिका गाजल्या .हिंदीत देखिल त्यांनी काही चित्रपट केले . परन्तु त्यात त्यांना यश मिळाले नाही . त्यानी सत्ताधीश नावाचा चित्रपट देखिल निर्माण केला परन्तु तो फारसा चालला नाही . सध्या ते टी .वि .वर काही मालिकेत काम करतात .  

Tuesday, August 31, 2010

मधु आपटे

मधु आपटे
बोबडे बोल हा एकमेव गुण (?) असुनही  केवळ त्यावर अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपट करणारे हे  एकमेव  कलावंत असतील . गोंधळ करणे , बोबडे बोलने ह्यावर अनेक चित्रपट करून त्यांनी लोकांचे हुकमी हसे वसूल करून मराठी तसेच हिंदीत स्वतन्त्र ओळख निर्माण केली . मधु आपटे ह्यांच्या भूमिका बहुदा नोकर , गडी अशाच प्रकारच्या असत . त्यांचे कामही खुप काळ नसे . परन्तु त्यात ते आपल्या गोंधळ करणार्या भुमिकेने धमाल अणित . त्यांच्या विनोदाचा प्रकार हा वेगला असे . त्यांच्या भूमिकेत कपट , गंभीर पना याचा लवलेश नसे . प्रामाणिक अशा नोकर किवा गड्याच्या भूमिका ते छान करीत .    

Sunday, August 29, 2010

लता मंगेशकर

लता मंगेशकर (२८ सप्टेम्बर १९२९ )




आनंदघन या नावाने लता मंगेशकर यांनी साधी माणसे या चित्रपटास संगीत दिले होते. यात वाद्यांचा खुपच कमी वापर करण्यात आला होता. तरीही या मधील गाणी अतिशय सुरस व कर्णमधुर आहेत.


>>> ऐरनिच्या देवा तुला


>>> माळ्याच्या मल्या मंदी


ही गाणी आजही आवडीने ऐकली जातात ......

सीमा देव

सीमा  देव
सोशिक ,सात्विक भूमिका द्वारे मराठी तसेच हिंदी चित्रपटावर आपली छाप असलेली अभिनय संपन्न अभिनेत्री . आपल्या पति अभिनेता रमेश देव यांच्या सोबत अनेक चित्रपट केले .रमेश देव यांच्या बरोबर चित्रपटात त्यांच्या प्रेमिकेची भूमिका करता करता त्या त्यांच्या जीवनात त्यांच्या अर्धांगिनी झाल्या . हिंदीत देखिल या जोडीने अनेक भूमिका एकत्र केल्या आहेत .  राजा परांजपे यांच्या सोबत जगाच्या पाठीवर मधील त्यांची भूमिका खुपच गाजली . भूमिका करताना मुद्रा ,डोळे यांचा वापर करून त्या आपल्या अभिनयात गहिरे रंग भरतात. हिंदीत आनंद ,संतान या चित्रपटात त्यांच्या भूमिका आजही नावाजल्या जातात .  आजही चित्रपटात कार्यरत आहेत .

रमेश देव

रमेश देव  
नायक , खलनायक , चरित्र अभिनेता , निर्माता , दिग्दर्शक अशा विविध रुपात यशस्वी ठरलेला , मराठी तसेच हिंदी चित्रपटात गाजलेले एक बहुधंगी व्यक्तिमत्व . सुरवातीला त्यांच्या  पत्नी   सीमा देव यांच्याबरोबर जोड़ी जमली .या जोडीने अनेक चित्रपटात नायक नायिका या  भूमिकेत काम केले . दोस्त असावा तर असा , भिग्री हे त्यांचे चित्रपट गाजले . स्वताच्या प्रोडक्शन खाली त्यांनी सर्जा हा  चित्रपट काढला .त्यांचे  चित्रपट हे प्रेरणादायी असतात . नुकताच त्यांचा जेता हा चित्रपट आला होता . चित्रपटात काम करताना त्यांनी नेहमीच खुशमिजाज , आशादायी  व्यक्तिमत्वे  साकारली आहेत .  

मधुकर तोरदमल

मधुकर तोरदमल
मुळ प्राध्यापक . "तरुण तुर्क म्हातारे अर्क" ह्या नाटकाचे लेखक . हे नाटक खुपच गाजले . त्यात ते प्राध्यापक करीत . हा ही ,   हे, ह्या अशा शब्दांचा वापर करून केलेले विनोद खुपच हसवित. याच धर्तीवर नंतर त्यांनी" म्हातारे अर्क बाईत गर्क "हे नाटक काढले ते फारसे चालले नाही . मराठीत ज्योतिबाचा नवस , सिंहासन ह्या चित्रपटात त्यांच्या  भूमिका गाजल्या . आमच्या सारखे आम्हीच या चित्रपटात त्यांनी केलेली भूमिका देखिल गाजली . करारी व्यक्तिमत्व , खर्जातिल आवाज , डोळे ,मुद्रा यांचा वापर ही अभिनयाची वैशिष्ट्ये . ज्योतिबाचा नवस ह्या चित्रपटात काम करताना  दरोड़ेखोराच्या प्रेमात पडलेल्या  मुलीचा कर्तव्यदक्ष इन्स्पेक्टर बाप त्यांनी अप्रतिम साकारला होता .          

महेश कोठारे

महेश कोठारे
बालवयात कारकिर्दीला प्रारंभ . अनेक हिंदी चित्रपट केले . मराठीत लेक चालली  सासराला हयात  ते नायक होते .  त्यानंतर जेनमा नावाची स्वताची संस्था काढून  धूमधडाका हा स्वताचा  पहिला चित्रपट निर्मित दिग्दर्शित केला .हिंदी प्यार किये जा ह्या चित्रपटाशी कथासाम्य असलेला   हा चित्रपट लैंडमार्क ठरला . ह्याच द्वारे  लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांनी पदार्पण केले . त्यानंतर थरथरात, धडाकेबाज , दे दनादन हे सर्व चित्रपट यशस्वी ठरले . माझा छकुला हा मराठी चित्रपट त्यांनी हिंदीत मासूम ह्या नावाने काढला . त्यांच्या चित्रपटात फँटसी वर जास्त भर असतो . वेगवान कथानक , धमाल गाणी ही त्यांची चित्रपटाची वैशिष्ट्ये आहेत . खतरनाक ,ख़बरदार हे  चित्रपट देखिल चालले . सुरवातीच्या त्यांच्या  चित्रपटात ते स्वता नायक असत . आता चित्रपटात ते एखाद्या तरी सीन मध्ये चमकून जातात . चित्रपटात परोडी सॉन्ग त्यांनीच लोकप्रिय केले .   

Friday, August 27, 2010

जब्बार पटेल

जब्बार  पटेल
प्रायोगिक रंगभूमि , चित्रपट या दोन्ही क्षेत्रात स्वताचा ठसा   उमटाविनारा प्रतिभावान रंगकर्मी . कोलेजजीवन पासून रंगभूमीवर  वावर . सिंहासन , उम्बरठा , जैत रे जैत , एक होता विदूषक हे चित्रपट दिग्दर्शित केले .  सर्वच चित्रपट राज्य तसेच राष्ट्रीय पारितोषिक विजेते आहेत . त्यानी दिग्दर्शित केलेला सामना हा चित्रपट आजही मराठीत मैलाचा दगड मानला जातो . नाटकासाठी त्यानी थिअटर अकादमिची स्थापना केली . त्याद्वारे घाशीराम कोतवाल हे नाटक रंगमंचावर आणले. हे नाटक अतिशय गाजले .

रंजना देशमुख

रंजना देशमुख
रंजना नावाने प्रसिद्द . मराठी चित्रपटात अभिनयाचा नवा अध्याय निर्माण केला . व्ही .शांताराम यांच्या चानी हा प्रथम  चित्रपट . अतिशय कमी कालावधीत सर्व प्रकारच्या भूमिका केल्या . अशोक सराफ , यशवंत दत्त,रविन्द्र महाजनी यांच्याबरोबर जोड़ी जास्त जमली . अरे संसार संसार या चित्रपटात भूमिका अभिनयाचा कस दाखविणारी होती . सुशीला ,हलदी कुंकू , लक्ष्मी हे चित्रपट विशेष गाजले . उत्स्फूर्त अभिनय , अचूक संवाद फेक ,डोळे , मुद्रा यांचा  वापर ही अभिनयाची वैशिष्ट्ये . अपघातामुले  कारकिर्दीला अचानक चाप बसला . त्यातूनही जिद्दीने पुन्हा रंगमंचावर पुनरागमन .परन्तु ते यशस्वी ठरले नाही .    

Thursday, August 26, 2010

व्ही . शांताराम

व्ही . शांताराम  
चित्रपट महर्षि . मराठी तसेच हिंदी मध्ये मोलाची कामगिरी . अनेक चित्रपट निर्मिती तसेच दिग्दर्शन . त्यांच्या चित्रपटात  श्रेयनामावली ही नेहमीच वेगळी आकर्षक असे .तंत्र प्रगत झालेले नसताना त्यांनी केलेले प्रयोग  आजही अचंबित करतात . दो आखे बारह हाथ , डॉक्टर कोटनिस की अमर कहानी , झनक झनक पायल बाजे , गीत गया पत्थरोने  ( जीतेन्द्र चा पहिला )   हे चित्रपट त्यांच्या वेगले  पणाची साक्ष आहेत . मराठीत त्यांचे अनेक चित्रपट गाजले आहेत . शेजारी , पिंजरा ह्यासारखे अनेक चित्रपट त्यानी दिग्दर्शित केले आहेत . प्रभात फ़िल्म कंपनी मधून  बाहेर पडून राजकमल ह्या चित्रपट कंपनीची स्थापना केली . त्याद्वारे अनेक चित्रपट काढले .  दो आखे बारह हाथ , डॉक्टर कोटनिस की अमर कहानी ह्या मधील त्यांच्या नायकाच्या भूमिका त्यांच्या अभिनयाची साक्ष आहेत .

सचिन पिलगावकर

सचिन पिलगावकर    
मास्टर  सचिन ह्या नावाने प्रसिद्द . बालवयात  अभिनयाला सुरवात .  पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार . मराठी तसेच हिंदी चित्रपटात नायकाच्या अनेक भूमिका गाजल्या.स्वतन्त्र चित्रपट दिग्दर्शनाला  सुरुवात " अष्टविनायक " या चित्रपट पासून . त्यानंतर अनेक यशस्वी चित्रपट दिले . अशोक सराफ , लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सोबत अनेक चित्रपट केले . दुरचित्रवानी वर देखिल अनेक यशस्वी मालिकांचे दिग्दर्शन केले आहे . नच बलिये  ह्या डांस शो मध्ये भाग घेउन सर्वोत्कृष्ट जोडीचा पुरस्कार मिळाला . अनेक चित्रपट राज्य पारितोषिक विजेते तसेच लोकप्रिय देखिल झाले .हिंदी मध्ये गीत गाता चल , अखियोंके झरोको से , इ अनेक भूमिका प्रसिद्द आहेत .   

Tuesday, August 24, 2010

उषा नाइक

उषा नाइक
सुरवातीला छोट्या छोट्या भूमिका करीत . मुख्य नायिकेच्या मागे नाचताना  दिसत .किवा तमाशातिल मुख्य नायिकेच्या सोबत दिसत . त्यानंतर हिरोइनच्या भूमिका करू लागल्या . त्यांच्या भूमिकेत विविधता आहे . सांसारिक ,तमाशा किवा नकारात्मक भूमिकेत ही   त्या शोभून दिसतात . रविन्द्र महाजनी यांच्याबरोबर हलदी कुंकू या चित्रपटातील भूमिका गाजली . सख्या रे घायाळ मी हरिणी हे सामना ह्या चित्रपटातील गीत त्यांचेवर चित्रित करण्यात आले होते . संसार , आई ह्या चित्रपटातील भूमिका विशेष नावाजल्या  जातात .    

राजा गोसावी

राजा गोसावी
विनोदाचा बादशहा ही उपाधि सहजपणे मिरवनारा कलावंत . विनोदाची  उत्तम जाण. सहजसुंदर अभिनय , ही त्यांच्या अभिनयाची वैशिष्ट्ये . राजा परांजपे , शरद तलवलकर यांच्याबरोबर त्यांची चांगली जोड़ी जमली . राजा परांजपे यांच्याबरोबर लाखाची गोष्ट हा चित्रपट अतिशय गाजला. राजा गोसावी हे रंगभूमीवर ही काम करीत . लग्नाची बेडी,   करायला  गेलो एक ही नाटके गाजली . उत्तर आयुष्यात त्यांनी नट   सम्राट हे नाटक करण्याचा प्रयत्न केला परन्तु तो फारसा यशस्वी झाला नाही .               

Monday, August 23, 2010

आशा काले

आशा काले
मराठी चित्रपटात ताई ,वहिनी किवा   सोशिक सुनेच्या भूमिका करून विशेषता ग्रामीण प्रेक्षकांच्या मनात एक सोज्वळ स्थान निर्माण करणारी अभिनय संपन्न अभिनेत्री . सतीच वान , सासुर्वाशिन ह्या चित्रपटात भूमिका करताना त्यांनी प्रेक्षकांच्या डोळ्यात पानी आणले . सहज सुन्दर अभिनय , डोळे ,मुद्रा यांचा सुयोग्य वापर ही त्यांच्या अभिनयाची वैशिष्ट्ये होती .अनेक मराठी नाटकात त्यांनी भूमिका केल्या .

Sunday, August 22, 2010

शरद तलवलकर

शरद तलवलकर (१ नोव्हेंबर १९१८ ते २२ ओगस्ट २००१    )
मराठी रंगभूमि व चित्रपट या दोन्ही ठिकाणी आपल्या अभिनयाने विनोदी, गंभीर अशा भूमिका करून अभिनयाचा स्वतत्र बाज निर्माण करणारा अभिनेता . घरोघरी हीच बोम्ब , अप्पाजिंची सेक्रेटरी ह्या नाटकात ते प्रेक्षकाना हसून हसून पोट धरायला लावित . राजा गोसावी यांचाशी त्यांची जोड़ी  जमली . या जोडीने अनेक चित्रपट केले . सहाय्यक अभिनेत्या बरोबर चरित्र अभिनेता , विनोदी तसेच गंभीर भूमिका  देखिल ते सारख्याच ताकतीने रंगवित . लेक चालली सासराला , धूमधडाका या चित्रपटात त्यांच्या भूमिका गाजल्या  .

Saturday, August 21, 2010

निलू फुले

निलू फुले
एक गाव बारा भानगडी या चित्रपटात अतिशय बारीक़ शरीराचा झेले अन्ना साकारून   निलुभाऊ 
यांनी मराठीला एक नविन प्रकारचा कारस्थानी, आतल्या गाठिचा खलनायक दिला अणि मराठीला एक सशक्त अभिनेता मिळाला. पुढे ग्रामीण पुढारी म्हणजे निलुभाऊ हे समीकरण बनले . सामना ,लक्ष्मी अशा चित्रपट मधून भूमिका करताना चोरीचा मामला , हरया नार्या जिंदाबाद यात विनोदी भूमिका केल्या . सिंहासन या चित्रपटात दिनु या पत्रकाराची भूमिका करताना अभिनयाचे गहिरे रंग भरले . रंगभूमीवर त्यांनी केलेला सखाराम  बैंडर अजरामर झाला . सूर्यास्त , कथा अकलेच्या कांद्याची ही  त्यांनी भूमिका केलेली नाटके खुपच गाजली . निलुभाऊ हिंदीत देखिल काम करीत .सारांश ,कुली या चित्रपटात त्यांनी केलेल्या भूमिका रसिकांच्या आजही स्मरणात  आहेत .

रूही बेर्डे

रूही बेर्डे
अनेक मराठी व हिंदी चित्रपटात भूमिका केल्या . प्रसिद्द अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या प्रथम पत्नी . लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशी   प्रेम जमले तेव्हा त्या बरयापैकी नावलौकिक कमावलेल्या अभिनेत्री होत्या तर    लक्ष्मीकांत यांना अजुन पाय रोवायाचे  होते . रूही बेर्डे  यांनी अनेक नाटकात  कामे केली . त्यात  लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर "शांतेच कार्ट चालू आहे " हे नाटक तूफान गाजले .  कैन्सरने त्यांचा दुर्दैवी मृत्यु झाला . 

Friday, August 20, 2010

जयश्री गडकर

जयश्री गडकर (२१ फेब्ब्रुवारी १९४२ ते २९ अगस्त २००८ ) 
सर्व प्रकारच्या स्री भूमिका अत्यंत मनापासून करणारी , सर्व प्रकारच्या भूमिकामद्ये शोभणारी एकमेव अभिनेत्री म्हणजे जयश्री गडकर . तमाशा असो , आधुनिक गृहिणी असो , साधी गावरान भूमिका असो की  पौराणिक पटात देवाची भूमिका असो सर्व भूमिका जयश्री गडकर यांनी अतिशय समरसून केल्या . आणि त्या भूमिका त्याना शोभल्या देखिल . सूर्यकांत ,अरुण सरनाईक यांच्या बरोबर त्यांची जोड़ी जमली .सांगते ऐका , एक गाव बारा भानगडी हे त्यांचे गाजलेले चित्रपट . हिंदीत त्यांनी अनेक पौराणिक चित्रपट केले .          

Thursday, August 19, 2010

गणपत पाटील

गणपत पाटील (१९२० ते २३ मार्च २००८ )
पाटील आणि तमाशा ह्याच बरोबर आवश्यक ठरला तो नाच्या.ही भूमिका अनेक चित्रपट साकार करताना गणपत पाटील ह्यांच्या शिवाय दूसरा नाच्या प्रेक्षकानी देखिल स्वीकारला नाही. इतके ते ही भूमिका अप्रतिम करीत आणि प्रेक्षागार हसून हसून लोटपोट होत असे . स्वत अशा भूमिका करीत असताना त्याना बाह्य जगात मात्र अतिशय त्रास झाला . ह्या भूमिकेतून त्यानी बाहेर पडण्याचा देखिल प्रयत्न केला . परन्तु त्यात ते यशस्वी झाले नाहीत . एक गाव बारा भानगडी , गणान घुंगरू हरवल इ . त्यांचे  चित्रपट खुप गाजले . नुकताच निघालेला नटरंग हा चित्रपट त्यांच्या आयुष्याशी साम्य असलेला आहे .     

राजा परांजपे

राजा परांजपे   (२४ एप्रिल १९१० ते ०९ फेब्रुवारी १९७९)
कोणतेही हिरोला साजेसे रूप ,रंग नसताना केवळ आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठीत स्वताचे स्थान निर्माण केले . राजा परांजपे यांनी अनेक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती तसेच दिग्दर्शन देखिल केले . आपल्या नविन चेहरे मराठीत आणले. जगाच्या पाठीवर , लाखाची गोष्ट हे त्यांचे चित्रपट गाजले. पाठलाग ह्या त्यांच्या चित्रपटावर हिंदीत मेरा साया हा चित्रपट निघाला . प्रसिद्द लेखक ग.दी . माडगुलकर ह्यांच्या कथा , गीते आणि परांजपे यांचे दिग्दर्शन हे समीकरण अतिशय यशस्वी ठरले होते .         

दादा कोंडके

दादा कोंडके (०८ ऑगस्ट १९३२ ते १४ मार्च १९९८ )
मराठीत एक स्वताचा स्वतंत्र विनोदाचा बाज आणून तो हिट करणारा अवलिया कलाकार . "विछा माझी पूरी करा "  हे त्यांचे  लोकनाट्य अतिशय हिट झाले . वसंत सबनीस यांनी लिहिलेल्या "छपरी पलंगाचा वग " ह्याचे नाव बदलून "विछा माझी पूरी करा " नावाने त्यानी रंगभूमीवर आणले. जे धो धो चालले . त्यातून मिळालेल्या उत्पन्नातून   त्यानी पहिला चित्रपट काढला "सोंगाड्या ".

Wednesday, August 18, 2010

स्मिता पाटील

स्मिता पाटील  (१७ ओक्टोबर १९५५ ते १३ दिसम्बर १९८६ )
मराठी चित्रपट स्रुष्टिला पडलेले एक सुन्दर स्वप्न म्हणजे स्मिता पाटील . परिपक्व अभिनय , मोजक्या भूमिका, जिव ओतून काम करण्याची वृत्ति यातून तिने मराठीवर स्वताचा एक स्वतंत्र ठसा उमटवला.जैत रे जैत , उम्बरठा हे  चित्रपट तिच्या अभिनयाची साक्ष आहेत . आपल्या छोट्याशा आयुष्यात स्मिताने मराठी चित्रपटावर अधिराज्य केले . सामना  मधील छोटी भूमिका असो की उम्बरठा मधील पूर्णता स्रीवादी भूमिका असो स्मिता दोन्ही ठिकाणी सारख्याच ताकतीने वावरली .     

Saturday, August 14, 2010

थोडेसे ब्लॉग विषयी

                     वेब साईट  मराठी  चित्रपट विषयी   शोधताना असे पाहीले की अनेक  मराठी  नामवंत कलावंत यांचे बाबत वेब साईट वर खुपच कमी माहिती आहे. अनेक कलाकार  तर शोधासाठी  देखिल उपलब्ध नाहीत. अशा  कलावंतांची एकत्र अशी माहिती एका ठिकाणी यावी ह्यासाठी  हा ब्लॉग.     


  नुकताच हरिशचंद्राची फैक्ट्री नावाचा चित्रपट आला होता . दादासाहेब फाल्के यांनी घेतलेले परिश्रम त्यात दाखविले होते. हाच वारसा पुढे व्ही . शांताराम , राजा परांजपे , राजा ठाकुर, भालजी पेंढारकर , राजा गोसावी , जयश्री गडकर, सूर्यकांत, चंद्रकांत, दादा कोंडके, ललिता पवार , लक्ष्मीकांत बेर्डे ........किती किती म्हणून नावे सांगावित ? याच कलावंतांची आज कुठेही माहिती नेट वर मिळत नाही.                   चित्रपट कलावंतांची ही परिस्थिति तर नाट्य कलाकारांची माहिती तर अजिबात नाही . अशा कलाकारांनी मराठीचे सांस्कृतिक दालन समृद्ध  केले आहे . जून्या हिंदी  चित्रपटांच्या सी . डी. उपलब्ध आहेत .. पण मराठीचे काय ?हे कलाकार आपण असेच विसरणार का ?  हेच प्रश्न हा ब्लॉग लिहिताना मनात आहेत .  




                                  मित्रानो ,मला अशी माहिती एकत्र  करायला तुम्ही सहकार्य करावे हीच गणराज चरणी प्रार्थना .