Thursday, September 30, 2010

विक्रम गोखले

विक्रम गोखले
एक  सशक्त, गंभीर भूमिका करणारा दर्जेदार कलावंत. मराठी चित्रपट अणि रंगभूमि अशा दोन्ही मध्ये सारख्याच ताकतीने वावर . हिंदीत देखिल स्वताची छाप पाडली. आवाजावर विलक्षण पकड़, मुद्रा , डोळे तसेच अकुनच देह्बोलिचा वापर अभिनयात करतात .  नायक तसेच चरित्र अभिनेता म्हणून अनेक भूमिका केल्या आहेत . स्पष्टवक्ता ,स्वतन्त्र विचार ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत . माहेरची साड़ी ह्या चित्रपटात त्यांची भूमिका गाजली .हिंदीत हम दिल दे चुके सनम मधील करारी बाप त्यानी उत्तम सादर केला आहे . रंगभूमीवर त्यानी अनेक नाटके केली आहेत . प्रसिद्ध सिने अभिनेते स्व. श्री चंद्रकांत गोखले हे त्यांचे वडिल .     

Wednesday, September 22, 2010

मधु कांबिकर

मधु  कांबिकर 
छोट्या छोट्या भूमिका करीत नायिकेच्या भुमिकेपर्यंत पोचलेली एक गुणी अभिनेत्री . नृत्य हा त्यांचा मुख्य गुण . पूर्वी त्या मुख्य नायिकेच्या मागे नाचनार्या छोट्या भूमिका करीत . तमाशाच्या फडात काम करणारी नृत्यांगना ही त्यांची मुख्य ओळख .    अशा अभिनेत्रिने " शापित " या चित्रपटात केलेली भूमिका अत्यंत गाजली . ह्या चित्रपटाने त्यांच्या अभिनयाची दिशाच बदलली . ह्या चित्रपटात त्यानी आपल्या अभिनयाने गहिरे रंग भरले .हा चित्रपट त्यांच्या आयुष्यात बदल करणारा होता . त्यानंतर त्यांची स्वताची खर्या अर्थाने स्वतन्त्र ओळख निर्माण झाली . आता त्या चरित्र अभिनेत्रीच्या भूमिका करतात .

Sunday, September 12, 2010

रत्नमाला

रत्नमाला
दादा कोंडके यांची आये . तोंडात शिवी पण मनाने चांगली अशी आये त्यांनी  दादांच्या अनेक चित्रपटात झोकात रंगविली . त्यांचे सहज सोपे पण रांगडे संवाद रसिकांची दाद घेवुन गेले . त्यापूर्वी चरित्र अभिनेत्री म्हणून त्या गाजल्या . मुद्रा ,डोळे यांचा सहज वापर , बोलका चेहरा याद्वारे त्या सहज सुन्दर अभिनय करीत . चरित्र अभिनेत्री करताना विशेषता त्या सोशिक आई , सासु या भूमिका उत्तम करीत . दादा कोंडके यांच्या बरोबर मात्र त्यांची आई ही भूमिका  कजाग, भांडखोर अशीच असे . रसिकाना त्यांच्या इतर भूमिका माहित असल्या तरी दादा कोंडके यांची आये मात्र कायम लक्षात राहिली आहे .       

आचार्य अत्रे

आचार्य अत्रे
मराठी मानुस ज्या दैवताना मानतो त्यात अत्रे यांचे नाव निश्चित घ्यावे लागेल . श्यामची आई  सारखा चित्रपट काढून त्यांनी मराठीला एक देणगीच दिली आहे . या चित्रपटाला राष्ट्रपति पारितोषिक मिळाले . त्यांचा दूसरा चित्रपट महात्मा ज्योतिबा फुले . हा चित्रपट देखिल राष्ट्रपति पारितोषिक विजेता ठरला . अनेक विनोदी नाटके त्यानी लिहिली . लग्नाची बेडी , साष्टांग नमस्कार ही त्यांची नाटके रंगभूमि गाजवित आहेत . धो धो करून हसवणारा विनोद  एकीकडे   तर संस्कृति दाखविनारे चित्रपट दुसरीकडे अशा दोन्ही प्रकारची टोके समर्थ पणे त्यानी साकार  केली .

गो . नि . दांडेकर

गो . नि . दांडेकर
मराठी  कथा, कादंबर्या त्याच प्रमाणे मराठी नाटक, चित्रपट यात  वेगळ्या कथा लिहिल्या आहेत . त्यांच्या पवना काठाचा धोंडी , जैत रे जैत ह्या कादंबर्या वर चित्रपट निघाले . ह्या मधून त्यांनी ग्रामीण तसेच आदिवासी भाग वेगळ्या  स्वरूपात पडद्यावर साकार केला .  जैत रे जैत मधील गाणी खुपच गाजली . निसर्गात रमणारा, निसर्गाची अवड असणारा नायक , स्फूर्ति देणार्या कथा ही त्यांच्या कथेची वैशिष्ट्ये होत .    

Tuesday, September 7, 2010

दत्ता भट

दत्ता  भट 
अनेक  मराठी  नाटके , चित्रपट याद्वारे मराठी रंगभूमि तसेच चित्रपट   स्रुष्टिला आपल्या प्रगल्भ अभिनयाने  परिचय करून देणारा चरित्र अभिनेता .नटसम्राट या नाटकातील अप्पासाहेब बेलवलकर ही भूमिका  ताकतीने उभी  करणार्या कमी अभिनेत्यांमध्ये   त्यांची गणना होते . सिहासन या चित्रपटात ग्रामीण आमदार त्यांनी ज्या प्रकारे उभा केला आहे त्याला खरोखर तोड़ नाही . खर्जातिल बोलने , उत्कृष्ट मुद्राभिनय ही त्यांची अभिनयाची वैशिष्ट्ये .  

निवेदिता जोशी सराफ

निवेदिता जोशी सराफ
अशोक सराफ यांच्या पत्नी व प्रसिद्द अभिनेत्री . महेश कोठारे , सचिन  यांच्या अनेक चित्रपटात नायिका , सहनायिका म्हणून काम केले . हिंदीतील अपनापन मधून  चित्रपटात पदार्पण . मराठी नाटके देखिल गाजली . अशी ही बनवा बनवी , धूमधडाका , आमच्या सारखे आम्ही  इ . चित्रपट गाजले . रंगभूमीवर देखिल वेगला ठसा निर्माण केला . मराठी चित्रपट निर्मिती क्षेत्रात उतरून यशस्वी निर्मात्या ठरल्या आहेत . जाहिरात , नाटक , चित्रपट , अशा विविध क्षेत्रात अजूनही जोमाने कार्यरत आहेत . 

Wednesday, September 1, 2010

रविन्द्र महाजनी

रविन्द्र महाजनी  
मराठी चित्रपट स्रुष्टिला लाभलेला देखणा , रुबाबदार अभिनेता . मराठीला त्यांचे रुपाने एक हिंदीच्या तोडीचा अभिनेता लाभला .  रविन्द्र महाजनी यांची रंजना , उषा नाइक ,आशा काले    यांच्या बरोबर    अनेक चित्रपटात जोड़ी जमली . मुम्बैचा फौजदार , हलदी कुंकू , दुनिया करी सलाम , गोंधलात गोंधळ   या  चित्रपटात त्यांच्या भूमिका गाजल्या .हिंदीत देखिल त्यांनी काही चित्रपट केले . परन्तु त्यात त्यांना यश मिळाले नाही . त्यानी सत्ताधीश नावाचा चित्रपट देखिल निर्माण केला परन्तु तो फारसा चालला नाही . सध्या ते टी .वि .वर काही मालिकेत काम करतात .