उषा चव्हाण

उषा चव्हाण


         लावणी ह्या प्रकारातला नखरा ,ठसका चित्रपटात साकार केला तो उषा चव्हाण यांनी. दादा कोंडके यांच्याबरोबर त्यांची जोड़ी जमली हे खरे असले तरी त्यांनी काही कौटुम्बिक सोज्वळ भूमिका अनेक चित्रपटात केल्या . यशवंत दत्त , कुलदीप पवार यांच्याबरोबर त्यांनी बरेच चित्रपट केले . दादा कोंडके यांच्या चित्रपटात ठसक्यात बोलून तोर्यात राहणारी नायिका त्या छान सादर करीत .
         पांडू हवालदार,राम राम गंगाराम हे त्यांचे दादा कोंडके यांच्या जोड़ीचे चित्रपट खुप गाजले त्यांनी स्वताची प्रोडक्शन कंपनी काढून चित्रपट निर्मिती देखिल केली .मात्र ते चित्रपट चालले नाहीत .