Tuesday, October 26, 2010

दामू आन्ना मालवंकर

दामू आन्ना मालवंकर 
जून्या काळात मराठी चित्रपटावर साम्राज्य करणारे विनोदी चरित्र अभिनेते . एक डोळा किंचित तिरका असल्याने त्या विनोदाला एक अंगभूत साथ मिलाली होती असेच म्हणता येइल . दिलीप प्रभावलकर यांचे आधी चिमणराव ही भूमिका करणारे कलावंत . बोलण्यात ठसका , संवादाची वेगळी फेक , डोळ्यांचा भन्नाट वापर  यातून ते प्रेक्षागार हशानि फुलवून टाकित . विनोदी भूमिका करताना गंभीर भूमिका देखिल त्यानी केल्या . कृष्ण धवल चित्रपटाचे एक वेगले व्यक्तिमत्व म्हणून दामू आन्ना हे प्रसिद्द आहेत . अनुनासिक स्वरात बोलने , बोलण्यात वेगळी छटा असे .

Monday, October 25, 2010

दया डोंगरे

दया डोंगरे
मराठी चित्रपट तसेच रंगभूमि या दोंहिमध्ये कार्यरत अभिनेत्री . मॉडर्न दिसणारी , विशेषता खलनायकी भूमिका करणारी एक दर्जेदार , अभिनय संपन्न अभिनेत्री म्हणून त्या प्रसिद्द आहेत . अभिनयात विलक्षण तरबेजपना दिसतो . करारी मुद्रा , देहबोली यातून त्या आपला अभिनय साकार करतात .    रंगभुमिवारिल अनेक नाटकात त्यानी भूमिका केल्या आहेत . सचिन दिग्दर्शित " नवरी मिले नवर्याला " ह्या मधील त्यांची भूमिका छान होती . दूरदर्शनची सुरवात झाली त्या काळात अनेक कार्यक्रम त्यानी केले आहेत . विशेषता चरित्र अभिनेत्री म्हणून त्या प्रसिद्द आहेत .अनेक मराठी नाटके , चित्रपट यात समर्थपणे काम करून त्यांनी स्वताची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.  

Saturday, October 23, 2010

फैयाज खान

  फैयाज खान 
फैयाज नावाने प्रसिद्द . रंगभूमि तसेच मराठी चित्रपट यात सारखेच योगदान . विशेषता मराठी संगीत नाटके केली आहेत .वसंतराव देशपांडे यांचे बरोबर  कट्यार ........मधे तिने साकारलेली हमीदा ही व्यक्तिरेखा खुप गाजली.  अश्रुंची झाली फुले हे , गुंतता ह्रदय हे अशी अनेक गाजलेली नाटके त्यानी केली आहेत . जयवंत दलवी यांच्या महानंदा कादंबरी वर आधारित त्याच नावाच्या चित्रपटात त्या नायिका होत्या . यातील " मागे उभा मंगेश , पुढे उभा मंगेश " हे गीत खुप गाजले . संयत अभिनय , मोजक्या भूमिका ही त्यांची कारकिर्दीची वैशिष्ट्ये आहेत .

Wednesday, October 6, 2010

दुर्गा खोटे

दुर्गा खोटे
कृष्ण धवल  चित्रपट युगापासुन  कार्यरत असलेल्या , मराठी आणि हिंदी चित्रपटात सारख्याच  ताकतीने काम करणार्या एक जेष्ठ अभिनेत्री .  सिनेमात काम करणे चांगले नाही अशा जमान्यात सुशिक्षित अशा दुर्गा बाई यानी चित्रपटाला एक घरंदाज अभिनेत्री दिली . सुरुवातीला   नायिका,त्यानंतर आई अणि त्यानंतर आजी ,सासु अशा भूमिका त्यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटात केल्या . आपल्या अतिशय लोभस , श्रेष्ठ अभिनयाने त्या नेहमीच गाजल्या .  

Sunday, October 3, 2010

कुलदीप पवार

कुलदीप पवार
मराठी चित्रपट स्रुष्टिला लाभलेला मर्द नायक . जावयाची जात ह्या मधून काम करताना त्यांनी आपला रांगडा नायक खुपच छान सादर केला . त्यानंतर नायका बरोबरच खलनायक देखिल त्यानी केले . तसेच काही विनोदी भूमिका देखिल केल्या .  मराठी चित्रपट करतानाच त्यांनी रंगभूमीवर देखिल पाऊल ठेवले . "राजकारण गेल चुलीत" तसेच इतर नाटके त्याची साक्ष आहेत .  आजही ते चित्रपट , रंगभूमि ह्या दोन्ही माध्यमात सारख्याच ताकतीने कार्यरत आहेत .