श्रीराम लागु
मराठीतील नटसम्राट ही बिरुदावली सार्थ करणारा श्रेष्ठ कलावंत , आपल्या सामाजिक जानिवानी स्वतन्त्र विचार सरनीने स्वताची वेगळी वाट जोपासनारा विचारवंत . चांगल्या कलाकृतीची दखल घेउन त्यावर भाष्य करणारा टीकाकार . प्रायोगिक नाट्य भूमिचा चिकित्सक . नटसम्राट सारखे नाटक त्यांनी वेगळ्याच उंचीवर आपल्या अदाकारिने नेले . पिजरा , सामना ,सिहासन या चित्रपटात त्यांनी जो अभिनय केला आहे त्याला खरोखरच तोड़ नाही . खर्जाचा गंभीर आवाज , मुद्रा ,डोळे यांचा उत्तम वापर ही त्यांची अभिनयाची वैशिष्ट्ये आहेत . मराठी ,हिंदी चित्रपट . तसेच रंगभूमि यात स्वताचा वेगला ठसा त्यांनी उमटवला आहे .
